Wednesday, September 16, 2020

प्रवासवर्णन


प्रवासच आणि माझ वाकडच आहे, आजपर्यंत कितीतरी प्रवास केला आणि नेहमीच काहीतरी घडलंय. कधी बस फेल तर कधी ट्रेन लेट ! म्हणून विचार आला की एकदा तरी हा अनुभव लिहवा.
          आज डोंबिवली ते यवतमाळ केलेला प्रवास अगदी वर्णनिय झाला. उद्या आपल्याला सकाळी लवकर  निघायचं आहे म्हणून रात्री जागुन सगळी तयारी केली.   डोंबिवली ते मुंबई एअरपोर्ट Ola cab book केली.
दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. उद्या सकाळी तरी पाऊस नसावा ह्या आशेने झोपले. सकाळी लवकर उठून तयारी केली ६ वाजता cab चा  message येणार होता. ६.३० झाले तरी मेसेज नाही. आता काय?  कसं जायचं ? डोंबिवली ते एअरपोर्ट distance बराच . त्यात flight  च्या वेळेत पोहोचायच होत. आता मात्र कठीण वाटायला लागलं.
खूप प्रयत्न केले cab book करण्याचे पण invain एकही cab available नाही. शेवटी local train ने जाण्याचं ठरवलं. सामान ,सोहम आणि पाऊस असे सूत जुळवायचे होते. नशिबाने local train मिळाली. First class च ticket काढले आणि बसलो train मध्ये.
दादर स्टेशन ला उतरल्यावर -आता पुढे काय? परत train की टॅक्सी?
पावसाचा जोर वाढत होता आणि तितक्याच कळले की सगळ्या trains cancel झाल्या आहेत. मग काय टॅक्सी नी जायचं ठरलं. टॅक्सी मिळेल की नाही शंकाच होती पण थोडं अंतर तुडवत गेल्यावर टॅक्सी मिळाली. Bags  ओल्या होत होत्या , traffic jam झालेला, कसं- बसं अर्ध अंतर पार केलं आणि टॅक्सी वाले म्हणाले उतरावे लागेल तुम्हाला. मला काहीच कळलं नाही .
"का काय झालं?" मी विचारले, त्यावर मामा बोलले "Engine गरम झालय खूप आता टॅक्सी चालणार नाही."
अरे देवा!आता मनात नाना शंका आल्या कारण   वेळेत पोहोचणे गरजेचे होते. उतरलो टॅक्सीतून आणि रिक्षा शोधायला लागलो, finally रिक्षा मिळाली. पाऊस धो धो पडत होता.  मुंबईचा पाऊस कसा असतो ते अनुभवायला मिळत होते. रिक्षा वाल भरधाव रिक्षा पळवत होता. रस्त्यांवर खूप पाणी साचलेले, ते तुडवत आम्ही जात होतो. समुद्राच्या लाटा याव्या तश्या पासाच्या सरी आदळत होत्या , कपडे भिजत होते जीव मुठीत धरून आम्ही रिक्षा कधी पोहोचते याची वाट बघत होतो.  वेळेत पोहोचणार की नाही हिच धाक- धुक वाटत होती . मुंबादेवी, सिध्दीविनायक सगळे देव आठवत होते. पण ह्या देवाच्या कृपेने पोहोचलो एकदाचे. मी संपूर्ण भिजलेली,सामानही भिजलेले होते. आपण पोहोचलो ह्यात धन्यता वाटत होती.  security check आणि बाकी सोपस्कार पार पडले. हुश्श केलं आणि विमानाकडे प्रस्थान केले. विमानात बसल्यावर चला आता आपण पोहोचणार असे वाटले कि announcement झाली weather clear नसल्यामुळे विमान संकेत आल्या शिवाय उडणार नाही. १/२ तास झाला,  १ तास झाला तरी आम्ही वाट बघत बसलेलो, परत मनात शंकेची पाल चुकचुकली आता काय? एवढ्या अथक प्रयत्नानंतर आपण इथे पोहोचलो आणि आता विमान उडालाच नाही तर? विचारशृंखला चालू झाली. सगळेच प्रवासी आपापले तर्क लावत होते. कुणी ह्याला फोन कर त्याला फोन कर.. लहान मुलांना"अरे आता नक्की उडेल विमान" अशी आशा दाखवत होते.  कुणी खुर्सी की पेटी कधी बांधायची  याची वाट बघत त्याच्याशीच चाळा करीत होते.
वाट बघत बसणं ही एक वाईट गोष्ट आहे असं मला जाणवायला लागलं आणि अनाउन्समेंट झाली, वाटलं चला आता उडणार विमान.
फुस ! काही काळ वाट बघावी लागणार हेच कळलं.
विमान प्रवास नको , पाऊस नको , काहीच नको अस वाटून कंटाळवाणे झाले . आता २ तास उलटले खरंच काही hopes नव्हत्या ,तेवढ्यात pls fasten your seat belt असच काहीस ऐकू आलं. भास होता का तो?
सगळे अलर्ट झाले आणि Yeah, विमान उड्डाण भरणार हे कळलं.
माझा आनंद गगनात मावेनासा झाला.  आनंद-गगनात मी रममाण झाले. नागपूर विमानतळावर पोहोचलो हे सुध्दा कळलं नाही. नागपूरला उतरल्यावर परत टॅक्सी ने  किंवा बस ने यवतमाळला जायचे होते. आता इथे परत काही अडथळा येऊ नये हि देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने ऐकलीही. लगेच टॅक्सी मिळाली आणि finally आम्ही यवतमाळला सुखरूप पोहोचलो.
सगळी केलेली खटपट फळास आली आणि अश्याप्रकरे ही साठां उत्तरांची कहाणी समाप्त झाली.

1 comment: