शाळेत मराठीच्या तासाला बरेच नव- नवीन शब्द शिकायला मिळायचे, त्यांचा वाक्यात उपयोग करायला फार मज्जा यायची. एकदा भूतदया हा शब्द बाईंनी शिकवला. त्या शब्दाचं खूप अप्रूप वाटलं. अर्थ तर प्राणीमात्रांवर दया असा पण मग त्यात हे भूत का आल असा प्रश्न मला पडलेला. बाल मनाला कुठेलेही प्रश्र्न पडू शकतात नाही का?
खरं तर आज हे सगळं का आठवतंय तर माझ्या पाच वर्षांच्या मुलाने ह्या शब्दाची आठवण करून दिली. तो आणि त्याचे दोन मित्र खेळत होते. एक मांजर तिथे सारखं घुटमळत होत. त्याच्या एका मित्राने त्या मांजराला दगड मारला आणि मित्रांमध्ये भांडण सुरू झालं, खेळणं सोडून सगळे घरी परतले.
मला नवल वाटलं की आज लवकरच खेळून पोट कसं काय भरल कारण जेवणा पेक्षाही आमचे खेळून पोट भरते .मग मी विचारले का रे आज काय झाले पोट बिघडलं की काय ? स्वारी जरा नाखूष होती. नक्कीच काहीतरी बिनसलंय ह्याचा अंदाज मला आला पण मी म्हटलं कट्टी - बट्टी अस काहीस झालंय म्हणून रागवला असेल. मी विचारणार तोच तो बोलाला -
"आई आज खेळताना एक माऊ आमच्या जवळ येत होती तर तेजस ने तिला दगड मारला तिला पळवायला मग मी त्याला ओरोडलो की दगड मारायचं नाही किती cute आहे ती. आई मला खूप राग आला त्याचा ,मला वाटल की मीच त्या माऊ समोर जाऊन उभा असतो तर दगड मला लागला असता आणि ती वाचली असती. तिला दगड लागला म्हणून ती रडत रडत पळून गेली.
आई मी त्याला सांगितलं परत माऊ ला दगड मारायचं नाही , नाहीतर मी तुझ्याबरोबर खेळणार नाही."
मी अवाक झाले ,हे काय बोलतोय हा . मी त्याला जवळ घेतले. आज मला त्याचं खरंच खूप कौतुक वाटलं. "मुलं देवाघरची फुलं " हे अगदी खरे आहे. आज तुला एक चॉकलेट नक्की मिळणार असे मी promise केले आणि स्वारी खुश झाली.
खरंच आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून मुलं बराच काही शिकत असतात . भूतदया हा शब्द त्याला माहिती नाहीये पण त्याचा गर्भितार्थ त्याला कधी कळला हे मला कळले नाही त्याच्या ह्या भावना मला जपायला हव्यात. ही आता माझी जबाबदारी आहे ह्याची मात्र जाणीव झाली.
शर्वरी जोशी
No comments:
Post a Comment