Tuesday, October 13, 2020

ऑनलाईन शाळा

काल एक forwarded post वाचण्यात आली  ..
"Good evening All,
*Online Class Time-Table*
Friday, 25th September 2020
8 am - 8.40 am
English Language zoom id ,PWD.... bla bla.. "
Office  watsapp गृपवर आलेली post होती.
अर्थात चुकून forward झाली असेल.  सगळे  officers ओरडत होते no such forwards pls.
हे सगळं वाचून विचार आला खरंच ह्या ऑनलाईन शिक्षणामुळे आयांची चागलीच दमछाक होतेय.
एकतर watsapp चे इतके groups झालेत आणि त्यात  शाळेचं अर्ध काम त्या watsapp वर असतं.  मग  इकडचे मेसेजेस तिकडे पाठवले जातात.
   Corona काळात ऑनलाईन शिक्षण सुरू  झाले आणि पालकांची परीक्षा सुरू झाली. मला वाटतं Pre-primary आणि Primary  चे पालक हा काळ कधीच विसरणार नाहीत. शाळा सुरू होत्या तोवर बर होत, मुलं शाळेत गेली की तेवढा मोकळा वेळ मिळताच सगळी कामे  व्हायची पण आता शाळा घरीच त्यामुळे सगळं गणितच बिघडलं.
Office  ची कामे,घरातली कामे हे सगळ करून शाळा पण घ्यायची. पूर्वी मुलं शाळेत शिकून यायची homework तेवढा घ्यावा लागायचा पण ऑनलाईन शाळे मूळे  classwork and homework असे डब्बल work करावे लागते.
पालक ही परीक्षा पास होतील पण मुलांचं काय? माझ्या मते ऑनलाईन शिक्षण म्हणावं तेवढी प्रभावी नाही. लहान मुलं सहवासातून आणि आजूबाजूच्या वातावरणातून बरच काही शिकत असतात आणि शाळेत हा सहवास  आणि वातावरण त्यांना मिळत. शाळेत जाण्यामुळे ते स्वावलंबी होतात. Technology कितीही प्रगत झाली तरी आचरण आणि व्यवहार हे तर अनुभवातूनच शिकता येत. शाळेला उगीच नाही ना मंदिर म्हणत! हे मंदिर जे मुलांना घडवत ते लवकर सुरू होवू दे रे महाराजा! हिच ईश्वचरणी प्रार्थना!
                                                            (शर्वरी जोशी)

भूतदया


शाळेत मराठीच्या तासाला बरेच नव- नवीन शब्द शिकायला मिळायचे, त्यांचा वाक्यात उपयोग करायला फार मज्जा यायची. एकदा भूतदया हा शब्द बाईंनी शिकवला. त्या शब्दाचं खूप अप्रूप वाटलं. अर्थ तर प्राणीमात्रांवर दया असा पण मग त्यात हे भूत का आल असा प्रश्न मला पडलेला. बाल मनाला कुठेलेही प्रश्र्न पडू शकतात नाही का? 
खरं तर आज हे सगळं का आठवतंय तर माझ्या पाच वर्षांच्या मुलाने  ह्या शब्दाची आठवण करून दिली. तो आणि त्याचे दोन मित्र खेळत होते. एक मांजर तिथे सारखं घुटमळत होत. त्याच्या एका मित्राने त्या मांजराला दगड मारला आणि मित्रांमध्ये भांडण सुरू झालं, खेळणं  सोडून सगळे घरी परतले. 
मला नवल वाटलं की आज लवकरच खेळून पोट कसं काय भरल कारण जेवणा पेक्षाही आमचे खेळून पोट भरते .मग मी  विचारले का रे आज काय झाले पोट बिघडलं की काय ? स्वारी जरा नाखूष होती. नक्कीच काहीतरी बिनसलंय ह्याचा अंदाज मला आला पण मी म्हटलं कट्टी - बट्टी अस काहीस झालंय म्हणून रागवला असेल. मी विचारणार तोच तो बोलाला - 
"आई आज खेळताना एक माऊ आमच्या जवळ येत होती तर तेजस ने तिला दगड मारला तिला पळवायला मग  मी त्याला ओरोडलो की दगड मारायचं नाही किती  cute आहे ती.  आई मला खूप राग आला त्याचा ,मला वाटल  की मीच त्या माऊ समोर जाऊन उभा असतो तर दगड मला लागला असता आणि ती वाचली असती.   तिला दगड लागला म्हणून ती रडत रडत पळून गेली.
आई मी त्याला सांगितलं परत माऊ ला दगड मारायचं नाही , नाहीतर मी तुझ्याबरोबर खेळणार नाही."
मी अवाक झाले ,हे काय बोलतोय हा . मी त्याला जवळ घेतले. आज मला त्याचं खरंच खूप कौतुक वाटलं. "मुलं देवाघरची फुलं " हे अगदी खरे आहे. आज तुला एक चॉकलेट नक्की मिळणार असे मी promise केले आणि स्वारी खुश झाली. 
खरंच आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून मुलं बराच काही शिकत असतात . भूतदया हा शब्द त्याला माहिती नाहीये पण त्याचा गर्भितार्थ त्याला कधी कळला हे मला कळले नाही त्याच्या  ह्या भावना मला जपायला हव्यात. ही आता माझी जबाबदारी आहे ह्याची मात्र जाणीव झाली.

शर्वरी जोशी

Wednesday, September 16, 2020

प्रवासवर्णन


प्रवासच आणि माझ वाकडच आहे, आजपर्यंत कितीतरी प्रवास केला आणि नेहमीच काहीतरी घडलंय. कधी बस फेल तर कधी ट्रेन लेट ! म्हणून विचार आला की एकदा तरी हा अनुभव लिहवा.
          आज डोंबिवली ते यवतमाळ केलेला प्रवास अगदी वर्णनिय झाला. उद्या आपल्याला सकाळी लवकर  निघायचं आहे म्हणून रात्री जागुन सगळी तयारी केली.   डोंबिवली ते मुंबई एअरपोर्ट Ola cab book केली.
दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. उद्या सकाळी तरी पाऊस नसावा ह्या आशेने झोपले. सकाळी लवकर उठून तयारी केली ६ वाजता cab चा  message येणार होता. ६.३० झाले तरी मेसेज नाही. आता काय?  कसं जायचं ? डोंबिवली ते एअरपोर्ट distance बराच . त्यात flight  च्या वेळेत पोहोचायच होत. आता मात्र कठीण वाटायला लागलं.
खूप प्रयत्न केले cab book करण्याचे पण invain एकही cab available नाही. शेवटी local train ने जाण्याचं ठरवलं. सामान ,सोहम आणि पाऊस असे सूत जुळवायचे होते. नशिबाने local train मिळाली. First class च ticket काढले आणि बसलो train मध्ये.
दादर स्टेशन ला उतरल्यावर -आता पुढे काय? परत train की टॅक्सी?
पावसाचा जोर वाढत होता आणि तितक्याच कळले की सगळ्या trains cancel झाल्या आहेत. मग काय टॅक्सी नी जायचं ठरलं. टॅक्सी मिळेल की नाही शंकाच होती पण थोडं अंतर तुडवत गेल्यावर टॅक्सी मिळाली. Bags  ओल्या होत होत्या , traffic jam झालेला, कसं- बसं अर्ध अंतर पार केलं आणि टॅक्सी वाले म्हणाले उतरावे लागेल तुम्हाला. मला काहीच कळलं नाही .
"का काय झालं?" मी विचारले, त्यावर मामा बोलले "Engine गरम झालय खूप आता टॅक्सी चालणार नाही."
अरे देवा!आता मनात नाना शंका आल्या कारण   वेळेत पोहोचणे गरजेचे होते. उतरलो टॅक्सीतून आणि रिक्षा शोधायला लागलो, finally रिक्षा मिळाली. पाऊस धो धो पडत होता.  मुंबईचा पाऊस कसा असतो ते अनुभवायला मिळत होते. रिक्षा वाल भरधाव रिक्षा पळवत होता. रस्त्यांवर खूप पाणी साचलेले, ते तुडवत आम्ही जात होतो. समुद्राच्या लाटा याव्या तश्या पासाच्या सरी आदळत होत्या , कपडे भिजत होते जीव मुठीत धरून आम्ही रिक्षा कधी पोहोचते याची वाट बघत होतो.  वेळेत पोहोचणार की नाही हिच धाक- धुक वाटत होती . मुंबादेवी, सिध्दीविनायक सगळे देव आठवत होते. पण ह्या देवाच्या कृपेने पोहोचलो एकदाचे. मी संपूर्ण भिजलेली,सामानही भिजलेले होते. आपण पोहोचलो ह्यात धन्यता वाटत होती.  security check आणि बाकी सोपस्कार पार पडले. हुश्श केलं आणि विमानाकडे प्रस्थान केले. विमानात बसल्यावर चला आता आपण पोहोचणार असे वाटले कि announcement झाली weather clear नसल्यामुळे विमान संकेत आल्या शिवाय उडणार नाही. १/२ तास झाला,  १ तास झाला तरी आम्ही वाट बघत बसलेलो, परत मनात शंकेची पाल चुकचुकली आता काय? एवढ्या अथक प्रयत्नानंतर आपण इथे पोहोचलो आणि आता विमान उडालाच नाही तर? विचारशृंखला चालू झाली. सगळेच प्रवासी आपापले तर्क लावत होते. कुणी ह्याला फोन कर त्याला फोन कर.. लहान मुलांना"अरे आता नक्की उडेल विमान" अशी आशा दाखवत होते.  कुणी खुर्सी की पेटी कधी बांधायची  याची वाट बघत त्याच्याशीच चाळा करीत होते.
वाट बघत बसणं ही एक वाईट गोष्ट आहे असं मला जाणवायला लागलं आणि अनाउन्समेंट झाली, वाटलं चला आता उडणार विमान.
फुस ! काही काळ वाट बघावी लागणार हेच कळलं.
विमान प्रवास नको , पाऊस नको , काहीच नको अस वाटून कंटाळवाणे झाले . आता २ तास उलटले खरंच काही hopes नव्हत्या ,तेवढ्यात pls fasten your seat belt असच काहीस ऐकू आलं. भास होता का तो?
सगळे अलर्ट झाले आणि Yeah, विमान उड्डाण भरणार हे कळलं.
माझा आनंद गगनात मावेनासा झाला.  आनंद-गगनात मी रममाण झाले. नागपूर विमानतळावर पोहोचलो हे सुध्दा कळलं नाही. नागपूरला उतरल्यावर परत टॅक्सी ने  किंवा बस ने यवतमाळला जायचे होते. आता इथे परत काही अडथळा येऊ नये हि देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने ऐकलीही. लगेच टॅक्सी मिळाली आणि finally आम्ही यवतमाळला सुखरूप पोहोचलो.
सगळी केलेली खटपट फळास आली आणि अश्याप्रकरे ही साठां उत्तरांची कहाणी समाप्त झाली.

Tuesday, November 19, 2019

आईचा अभिमान...



सहज आईला फोन केला आणि विचारले-आई काय करतेस ग? आई म्हणाली घर काम. आता साठी झाली तरी घर कामातून ती रिटायर्ड झाली नाही आणि होणारही नाही. थोडा वेल गप्पा झाल्या. फोन ठेवला.
मनात असंख्य आठवणी तरळून गेल्या. आईनी केलेले कष्ट, तिची धडपड, तिची तारेवरची कसरत कॅमेराचा रोल सरकावा तशी डोळ्यापुढे आली .
आपली आई अष्टपैलू असूनही घरकामात अडकलीय कारण परिस्थिती . मला आठवत मी लहान होते तेव्हा आई दोन ठिकाणी नोकरी करायची,drawing teacher म्हणून  शाळेत आणि music teacher म्हणून college मध्ये. शाळा आणि कॉलेज दोन्ही दोन टोकाला होते,पण ती न थकता ह्या टोकावरून त्या टोकाला चालत जायची. हे सगळं ती तिच्या चार पिल्लांसाठी करत होती ज्याप्रमाणे चीमिणी आपल्या पिलांसाठी चोचीत खाऊ आणते, घरट्यात त्यांची सुश्रुषा करते त्याप्रमणे . हे सगळं करत असताना ती सतत आनंदी आणि समाधानी असायची. तिच्यातला उत्साह अद्वितीय, तेव्हा मला कळत नव्हत पण आता विचार येतो ती कधीच थकलेली नसायची कुठून यायची एवढी energy?
एवढ्यावरच ती थांबली नाही..कीर्तन ,आकाशवाणी वर प्रोग्राम ,  संगीत class  घेणे अश्या अनेक प्रकारे ती सतत काम करत होती. 4 मुलीचं आहेत आपल्याला अस तिला कधीच वाटलं नाही.  मुली पुढे कश्या जातील ह्यासाठी ती झटत होती. एवढं सगळं करत असताना तिची तत्परता कधीही ढळली नाही.
आज सहज विचार केला माझ्या आईला काय येत नाही?  ह्या प्रश्नाला उत्तर मिळाल नाही मला. ती उत्तम drawing काढते, ती उत्तम गाते, कीर्तन उत्तम करते, कविता - गाणी उत्कृष्ट लिहिते, तीनी कथा सुद्धा लिहिल्या त.
तीच अक्षर आजही छान आहे. बापरे!  विसरलेच ती कपडेही छान शिवते. आम्ही लहानपणी आईनी शिवलेलेच ड्रेस  घालायचो. देवांचे कपडे तर खूप छान छान शीवते ती.  एवढंच काय महालक्ष्यामीच धड  पण तिनी घरीच बनवल, मुखवटे तेही paint केलेत. आणि हे सगळं ती तुटपुंज्या आणि घरात उपलब्ध असलेला  ऐवज वापरून करते.
अरे हा लग्नाची रुख्वत. सुपारीची विहिनीची पंगत, glass painting, biskitachi गाडी, मणी वर्क, रेशीम वर्क, आणि भरपूर काही ....
खरंच सर्व गुणसंपन्न आहे माझी आई.
तब्येतीनी थोडी खचली पण उत्साह कधीच कमी झाला नाही तिचा.
आईच्या हातचा चिवडा स्पेशल असतो ..मला कधीच तिच्या हातचा चिवडा खाण्याचा कंटाळा येत नाही मला रोज दिला तरी मी खाऊ शकते. अताही तोंडाला पाणी सुटलं. ती स्वयंपाकात नावीन्यपूर्ण पदार्थ , विविध experiment कर ते. तिच्या हाताची चव मला मात्र नाही.
प्रत्येकालाच आपली आई प्रिय असते. पण मला माझ्या आईचा खूप अभिमान वाटतो. माझ्या आईची आजही शिकण्याची तयारी आहे. स्मार्ट फोन सुध्धा ती शिकली.
परिस्थितीने खूप परीक्षा बघितली तिची पण ती कधीच डगमगली नाही. अजूनही ती खंबीर आहे. खूप भरभरून लिहावं वाटत तिच्याबद्दल .
एकच सल आहे मनात, एवढ्या अष्टपैलू आईसाठी आपण काहीच करू शकलो नाही.



Gharo Ghari matichya Chuli

संवाद

होम मिनिस्टर झी मराठी वरील मालिका गेले कित्येक वर्ष  मी बघतेय. आदेश बांदेकर विचारतात जावई कसा? सून कशी ?  सगळ्यांचं उत्तर ऐकलंआणि जरा आश्चर्य वाटलं.  नेहमीच जावई मुलगा झालेला असतो पण सून कधीच मुलगी झालेली नसते.
खरंच असं का असतं ते मला सासू सूनेतल्याहोणाऱ्या संवदावरून लक्षात आलं .
बघा ना विषय एकच पण आई - मुलीतला संवाद  आणि सासू -  सूनेतला संवाद ह्यात किती फरक असतो.
प्रसंग १-
    ८ महिन्याचा बाळ घरात आहे सूनेनी सफरचंद किसून आणला बाळा साठी. बाळ लवकर खात नव्हता. तेवढ्यात ते थोड लालसर दिसायला लागलं. आता ह्यावर आई आणि सासू काय बोलतील?
आई - अग अजून खात नाही का ग बाळ..लालसर झालं  सफरचंद ,मी प्रयत्न करते भरावयाचा
सासू - अग ,हे काय तिखट टाकून आणलास का किसात म्हणूनच खात नाही बाळ. मी दुसरं किसून आणते हे फेकून दे.

प्रसंग २-
 भांडी घासायला बाई येणार नाहीये.
आई - प्रिया आज बाई येणार नाहीये तू तेवढी भांडी घासून घे.
प्रिया - आई माझा आवरून झालं की मी घासते .
आई - हो ग कर तुझ्या सावडीनी.

सासू - प्रिया आज बाई येणार नाहीये.
सून - आई माझा आवरून झालं की मी घासते .
सासू - ठीक आहे ( स्वतः घासून टाकणार आणि वर म्हणणार किती वेळ पडून राहू द्यायची तुला कधी सवड होईल काय माहिती)

प्रसंग ३-
प्रिया - आई मी आंघोळी ला जातेय.
आई - आज लवकर आट प.

सून - आई मी आंघोळी ला जातेय.
सासू - तुला खूप वेळ लागतो जरा लवकर कर ..आम्ही तर लवकर करतो.
आई  आणि मुलगी यांच्यातला संवाद एकमेकांवर हक्क दाखविणारा असतो पण सासू - सूनेतला सतत एकमेकींच्या दोषांवर आरोप करणारा असतो.

प्रसंग ४-
कपडे खरेदीला गेल्यात
सासू - हा फार महाग वाटतो ड्रेस , एकच घे.
सून - मला दुसरा आवडलंय आई ,तो घेते.
सासू - पैसे तू देणार आहे ना,विनोद( मुलगा) ला नको खर्चात पाडू.
सून - हो मी देते की. (स्वगत- तुम्हाला थोडी पैसे मागितले.)

आई - हा फार महाग वाटतो ड्रेस ,  दुसरा बघ.
प्रिया -  दुसरा आवडलंय आई ,तो घेते.
आई- बरं बाई घे तुला हवा तो.

प्रसंग ५
भाजी तिखट झालेली आहे- प्रतिक्रिया .....
सासू - सू सू सू.  आज पाणी पिऊनच पोट भरेल. उद्या उपसाच करावा लागेल.

आई - अरे बापरे, अग किती तिखट केलीस भाजी. पुढल्या वेळी जरा जपून टाक तिखट.

प्रसंग ६
घरात साफ सफाई करायची आहे.
सून - उद्या मला सुट्टी आहे सकाळी लवकर साफ सफाई करून घेऊ आई.
सासू - ठीक आहे.
सकाळी उठल्यावर ...चला सगळ्यांनी लवकर आंघोळी करून घ्या . मग कपडे धुवायला फार उशीर होतो.
सून - अहो आज साफ सफाई करायचा ठरलं होत ना.
सासू - कशाला तुला वेळ नसतो तर उगीच करतेस , मी माझ्या सवडीने मला जमेल तसे करेल.
(सुनेने घरात कुठे हात लावलेला आवडत नसतो पण तस दर्शवा याच नाही)

आई ह्या प्रसंगी मुलीला विचारणार ...
अग साफ सफाई करायची आहे ना आज , चल मग मी मदत  करू का?

प्रसंग ७-
कपडे वाळत घालताना...
आई - कपडे जरा झटकून टाक वाळत.
प्रिया - हो ग बाई किती वेळा सांगतेस

सासू - कपडे उलटे करून टाक वाळत, आमच्याकडे सरळ नाही घालत आम्ही.
सून - हो का बरं ठीक आहे .( तुमच्या घरात्यातल्या पद्धतीने टाकते..  घर आपलं होईपर्यंत.)

प्रसंग ८-
सून - आई , पुढल्या आठवड्यात आई बाबा येणार आहेत माझे .
सासू - ( दोन दिवसांनी) तुझे आई बाबा येणार आहेत घरात किराणा आणून ठेवला पाहिजे , दूध वैगरे जरा जास्तच लागेल मग तशी तयारी करा.
सून - अहो महिन्याचा  किराणा आणलाय आपण आणि ते चार च दिवस राहणार आहेत.

प्रिया - आई मी  आणि सासू सासरे  आम्ही सगळेच येणार आहोत ग .
आई -  हो   येऊ दे  गा त्यांच्या आवडी निवडी तेवढ्या  सांग तशी तयारी करते मग.


असे अनेक प्रसंग सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. सासू कितीही चांगली असली तरी ती सासुच असते आई होवू शकत नाही आणि सूनही किती  चांगली असली तरी ती लेक होवू शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पटतंय का तुम्हाला?