Tuesday, November 19, 2019

Gharo Ghari matichya Chuli

संवाद

होम मिनिस्टर झी मराठी वरील मालिका गेले कित्येक वर्ष  मी बघतेय. आदेश बांदेकर विचारतात जावई कसा? सून कशी ?  सगळ्यांचं उत्तर ऐकलंआणि जरा आश्चर्य वाटलं.  नेहमीच जावई मुलगा झालेला असतो पण सून कधीच मुलगी झालेली नसते.
खरंच असं का असतं ते मला सासू सूनेतल्याहोणाऱ्या संवदावरून लक्षात आलं .
बघा ना विषय एकच पण आई - मुलीतला संवाद  आणि सासू -  सूनेतला संवाद ह्यात किती फरक असतो.
प्रसंग १-
    ८ महिन्याचा बाळ घरात आहे सूनेनी सफरचंद किसून आणला बाळा साठी. बाळ लवकर खात नव्हता. तेवढ्यात ते थोड लालसर दिसायला लागलं. आता ह्यावर आई आणि सासू काय बोलतील?
आई - अग अजून खात नाही का ग बाळ..लालसर झालं  सफरचंद ,मी प्रयत्न करते भरावयाचा
सासू - अग ,हे काय तिखट टाकून आणलास का किसात म्हणूनच खात नाही बाळ. मी दुसरं किसून आणते हे फेकून दे.

प्रसंग २-
 भांडी घासायला बाई येणार नाहीये.
आई - प्रिया आज बाई येणार नाहीये तू तेवढी भांडी घासून घे.
प्रिया - आई माझा आवरून झालं की मी घासते .
आई - हो ग कर तुझ्या सावडीनी.

सासू - प्रिया आज बाई येणार नाहीये.
सून - आई माझा आवरून झालं की मी घासते .
सासू - ठीक आहे ( स्वतः घासून टाकणार आणि वर म्हणणार किती वेळ पडून राहू द्यायची तुला कधी सवड होईल काय माहिती)

प्रसंग ३-
प्रिया - आई मी आंघोळी ला जातेय.
आई - आज लवकर आट प.

सून - आई मी आंघोळी ला जातेय.
सासू - तुला खूप वेळ लागतो जरा लवकर कर ..आम्ही तर लवकर करतो.
आई  आणि मुलगी यांच्यातला संवाद एकमेकांवर हक्क दाखविणारा असतो पण सासू - सूनेतला सतत एकमेकींच्या दोषांवर आरोप करणारा असतो.

प्रसंग ४-
कपडे खरेदीला गेल्यात
सासू - हा फार महाग वाटतो ड्रेस , एकच घे.
सून - मला दुसरा आवडलंय आई ,तो घेते.
सासू - पैसे तू देणार आहे ना,विनोद( मुलगा) ला नको खर्चात पाडू.
सून - हो मी देते की. (स्वगत- तुम्हाला थोडी पैसे मागितले.)

आई - हा फार महाग वाटतो ड्रेस ,  दुसरा बघ.
प्रिया -  दुसरा आवडलंय आई ,तो घेते.
आई- बरं बाई घे तुला हवा तो.

प्रसंग ५
भाजी तिखट झालेली आहे- प्रतिक्रिया .....
सासू - सू सू सू.  आज पाणी पिऊनच पोट भरेल. उद्या उपसाच करावा लागेल.

आई - अरे बापरे, अग किती तिखट केलीस भाजी. पुढल्या वेळी जरा जपून टाक तिखट.

प्रसंग ६
घरात साफ सफाई करायची आहे.
सून - उद्या मला सुट्टी आहे सकाळी लवकर साफ सफाई करून घेऊ आई.
सासू - ठीक आहे.
सकाळी उठल्यावर ...चला सगळ्यांनी लवकर आंघोळी करून घ्या . मग कपडे धुवायला फार उशीर होतो.
सून - अहो आज साफ सफाई करायचा ठरलं होत ना.
सासू - कशाला तुला वेळ नसतो तर उगीच करतेस , मी माझ्या सवडीने मला जमेल तसे करेल.
(सुनेने घरात कुठे हात लावलेला आवडत नसतो पण तस दर्शवा याच नाही)

आई ह्या प्रसंगी मुलीला विचारणार ...
अग साफ सफाई करायची आहे ना आज , चल मग मी मदत  करू का?

प्रसंग ७-
कपडे वाळत घालताना...
आई - कपडे जरा झटकून टाक वाळत.
प्रिया - हो ग बाई किती वेळा सांगतेस

सासू - कपडे उलटे करून टाक वाळत, आमच्याकडे सरळ नाही घालत आम्ही.
सून - हो का बरं ठीक आहे .( तुमच्या घरात्यातल्या पद्धतीने टाकते..  घर आपलं होईपर्यंत.)

प्रसंग ८-
सून - आई , पुढल्या आठवड्यात आई बाबा येणार आहेत माझे .
सासू - ( दोन दिवसांनी) तुझे आई बाबा येणार आहेत घरात किराणा आणून ठेवला पाहिजे , दूध वैगरे जरा जास्तच लागेल मग तशी तयारी करा.
सून - अहो महिन्याचा  किराणा आणलाय आपण आणि ते चार च दिवस राहणार आहेत.

प्रिया - आई मी  आणि सासू सासरे  आम्ही सगळेच येणार आहोत ग .
आई -  हो   येऊ दे  गा त्यांच्या आवडी निवडी तेवढ्या  सांग तशी तयारी करते मग.


असे अनेक प्रसंग सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. सासू कितीही चांगली असली तरी ती सासुच असते आई होवू शकत नाही आणि सूनही किती  चांगली असली तरी ती लेक होवू शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पटतंय का तुम्हाला?

No comments:

Post a Comment