Tuesday, October 13, 2020

ऑनलाईन शाळा

काल एक forwarded post वाचण्यात आली  ..
"Good evening All,
*Online Class Time-Table*
Friday, 25th September 2020
8 am - 8.40 am
English Language zoom id ,PWD.... bla bla.. "
Office  watsapp गृपवर आलेली post होती.
अर्थात चुकून forward झाली असेल.  सगळे  officers ओरडत होते no such forwards pls.
हे सगळं वाचून विचार आला खरंच ह्या ऑनलाईन शिक्षणामुळे आयांची चागलीच दमछाक होतेय.
एकतर watsapp चे इतके groups झालेत आणि त्यात  शाळेचं अर्ध काम त्या watsapp वर असतं.  मग  इकडचे मेसेजेस तिकडे पाठवले जातात.
   Corona काळात ऑनलाईन शिक्षण सुरू  झाले आणि पालकांची परीक्षा सुरू झाली. मला वाटतं Pre-primary आणि Primary  चे पालक हा काळ कधीच विसरणार नाहीत. शाळा सुरू होत्या तोवर बर होत, मुलं शाळेत गेली की तेवढा मोकळा वेळ मिळताच सगळी कामे  व्हायची पण आता शाळा घरीच त्यामुळे सगळं गणितच बिघडलं.
Office  ची कामे,घरातली कामे हे सगळ करून शाळा पण घ्यायची. पूर्वी मुलं शाळेत शिकून यायची homework तेवढा घ्यावा लागायचा पण ऑनलाईन शाळे मूळे  classwork and homework असे डब्बल work करावे लागते.
पालक ही परीक्षा पास होतील पण मुलांचं काय? माझ्या मते ऑनलाईन शिक्षण म्हणावं तेवढी प्रभावी नाही. लहान मुलं सहवासातून आणि आजूबाजूच्या वातावरणातून बरच काही शिकत असतात आणि शाळेत हा सहवास  आणि वातावरण त्यांना मिळत. शाळेत जाण्यामुळे ते स्वावलंबी होतात. Technology कितीही प्रगत झाली तरी आचरण आणि व्यवहार हे तर अनुभवातूनच शिकता येत. शाळेला उगीच नाही ना मंदिर म्हणत! हे मंदिर जे मुलांना घडवत ते लवकर सुरू होवू दे रे महाराजा! हिच ईश्वचरणी प्रार्थना!
                                                            (शर्वरी जोशी)

भूतदया


शाळेत मराठीच्या तासाला बरेच नव- नवीन शब्द शिकायला मिळायचे, त्यांचा वाक्यात उपयोग करायला फार मज्जा यायची. एकदा भूतदया हा शब्द बाईंनी शिकवला. त्या शब्दाचं खूप अप्रूप वाटलं. अर्थ तर प्राणीमात्रांवर दया असा पण मग त्यात हे भूत का आल असा प्रश्न मला पडलेला. बाल मनाला कुठेलेही प्रश्र्न पडू शकतात नाही का? 
खरं तर आज हे सगळं का आठवतंय तर माझ्या पाच वर्षांच्या मुलाने  ह्या शब्दाची आठवण करून दिली. तो आणि त्याचे दोन मित्र खेळत होते. एक मांजर तिथे सारखं घुटमळत होत. त्याच्या एका मित्राने त्या मांजराला दगड मारला आणि मित्रांमध्ये भांडण सुरू झालं, खेळणं  सोडून सगळे घरी परतले. 
मला नवल वाटलं की आज लवकरच खेळून पोट कसं काय भरल कारण जेवणा पेक्षाही आमचे खेळून पोट भरते .मग मी  विचारले का रे आज काय झाले पोट बिघडलं की काय ? स्वारी जरा नाखूष होती. नक्कीच काहीतरी बिनसलंय ह्याचा अंदाज मला आला पण मी म्हटलं कट्टी - बट्टी अस काहीस झालंय म्हणून रागवला असेल. मी विचारणार तोच तो बोलाला - 
"आई आज खेळताना एक माऊ आमच्या जवळ येत होती तर तेजस ने तिला दगड मारला तिला पळवायला मग  मी त्याला ओरोडलो की दगड मारायचं नाही किती  cute आहे ती.  आई मला खूप राग आला त्याचा ,मला वाटल  की मीच त्या माऊ समोर जाऊन उभा असतो तर दगड मला लागला असता आणि ती वाचली असती.   तिला दगड लागला म्हणून ती रडत रडत पळून गेली.
आई मी त्याला सांगितलं परत माऊ ला दगड मारायचं नाही , नाहीतर मी तुझ्याबरोबर खेळणार नाही."
मी अवाक झाले ,हे काय बोलतोय हा . मी त्याला जवळ घेतले. आज मला त्याचं खरंच खूप कौतुक वाटलं. "मुलं देवाघरची फुलं " हे अगदी खरे आहे. आज तुला एक चॉकलेट नक्की मिळणार असे मी promise केले आणि स्वारी खुश झाली. 
खरंच आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून मुलं बराच काही शिकत असतात . भूतदया हा शब्द त्याला माहिती नाहीये पण त्याचा गर्भितार्थ त्याला कधी कळला हे मला कळले नाही त्याच्या  ह्या भावना मला जपायला हव्यात. ही आता माझी जबाबदारी आहे ह्याची मात्र जाणीव झाली.

शर्वरी जोशी